खान्देशजळगांव

२६ जानेवारीला एक दिवसीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

२६ जानेवारीला एक दिवसीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

३० हजारांची रोख पारितोषिके
जळगांव प्रतिनिधी

स्व.श्री. उदयभाई वेद व स्व.श्री.निलेश आशर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, श्री गुजराती समाज मित्र मंडळ, जळगाव व जळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी एक दिवसीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रथम १५ व बेस्ट खान्देश, बेस्ट जळगाव ग्रामीण, बेस्ट व्हेटरन व वयोगट १९ याप्रमाणे प्रथम २ तसेच बेस्ट गर्ल /वुमन मध्ये प्रथम 5 यानुसार एकुण ३०,०००/- रुपयांची २८ रोख पारितोषिके तसेच एकुण ३५ ट्रोफीज ठेवण्यात आले आहे.
तसेच वयोगट ७ मध्ये प्रथम 3 येणाऱ्या खेळाडूंना तर , वयोगट ९,११,१३,१३,१५ , वयोगटात पहिले पाच क्रमांक येणाऱ्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सत्य वल्लभ भवन, रिंग रोड जळगाव येथे होणार आहे.
स्पर्धकांनी नावनोंदणी करिता आरती आशर(९५७९४३८८८९),परेश देशपांडे(९४२३५७२१७४), आकाश धनगर(9028275196),अभिषेक जाधव(73872 73157)यांच्याकडे संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button