जळगाव ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची अर्ध नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढून ते फोटो तिच्या होणाऱ्या पतीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट वर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एका विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 24 वर्षीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या अर्ध नग्न अवस्थेतील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी प्रफुल्ल सुधाकर सोनवणे उर्फ सूर्यवंशी राहणार वाघ नगर गॅस गोडाऊन जवळ याने दिली होती. हा प्रकार मे 2023 ते 7 सप्टेंबर 2023 दरम्यान घडला.तसेच आरोपी प्रफुल याने तरुणीच्या होणाऱ्या पतीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट वर अर्ध नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढून हे फोटो टाकून बदनामी केली. तसेच पीडित तरुणीच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी घेऊन वेळोवेळी 16 हजार रुपये उकळून तिच्या होणाऱ्या पतीच्या अकाउंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पीडित मुलीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून तिच्या पतीला या मुलीशी लग्न करीत असाल तर तीचे चारित्र्य वाईट असून तिच्याशी लग्न करू नका असा संदेश पाठवून बदनामी केली, म्हणून तालुका पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपी प्रफुल सोनवणे याच्याविरुद्ध 4 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भादवि कलम 384 ,504,385, 500,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.