खान्देशजळगांवसामाजिक

सालार नगरातील गॅस पंपाला मान्यता देऊ नये

सालार नगरातील गॅस पंपाला मान्यता देऊ नये

अर-रहेमान फाऊंडेशन आणि सालार नगर रहिवाशांची प्रशासनाकडे मागणी ; मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा

जळगाव प्रतिनिधी
शहरातील मेहरून शिवारात असलेल्या सालार नगर मध्ये गॅस पंप ला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आला असून  ते देण्यात येऊ नये  तसेच गॅस पंप उभारणीला येथील स्थानिक रहिवाशांचा विरोध असून दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी अर-रहेमान फाऊंडेशन आणि सालार नगर रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,सालार नगर सव्र्व्हे नं. १४, मेहरूणए शिवारात पुर्णतः रहिवास क्षेत्राच्या समोरील बाजू ला असलेल्या प्लॉटवर एलपीजी गॅस पंप सुरू झालेला आहे. सदर गॅस पंप Purely Residential Zone (R1-Zone) मध्ये येत आहे. पंपाच्या लागूनच्या प्लॉटवर रहिवासी अपार्टमेंट आहे व संपूर्ण वस्ती दाट रहिवासी क्षेत्र आहे. अशा पुर्णतः रहिवास क्षेत्रात गॅस पंपाची परवानगी कोणी दिली व कोणत्या MRTP ACT च्या कोणत्या कलमान्वये दिली, असे प्रश्न उपस्थित होत असून अशा क्षेत्रात गॅस पंपाची परवानगी देता येते का?
असा सवाल तक्रारदार रहिवाशांनी केला आहे.
मागील काही महिन्यापुर्वी एक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे पाच/सहा लोक दगावले आहे. सदर पंप आम्ही सालार नगर मधील रहिवाशांसाठी अत्यंत धोक्याचे आहे.तरी सदर गॅस पंप मधून हटविणे साठी संबंधीतांना आपल्या स्तरावर कृपया आदेश होऊन त्यांना जर एन.ओ.सी. दिली असेल तर कृपया ती रद्द करणे बाबत आदेश व्हावे ही आम्ही सर्व सालार नगर मधील रहिवासी यांची कडकडीची विनंती आहे.

जर सदर एन.ओ.सी.रद्द झाले नाही तर आम्ही रहिवासी यांना कायद्याच्या मार्गाने उपोषण किंवा अन्य प्रकारे कार्यवाही करावी लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button