चाळीसगाव : –चाळीसगाव येथील पाटबंधारे लिपिकाला १४ हजारांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत विभागाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता अटक केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. तुषार अशोक पाटील असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत दिला जातो मात्र पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर 1200 रुपये प्रमाणे 11 जणांकडून 14 हजार 400 रुपये मागणी करण्यात आली होती व या संदर्भात धुळे एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी सापळ्याच संशय आल्याने सापळा यशस्वी झाला नाही मात्र लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता तुषार अशोक पाटील यास अटक करण्यात आली.