गुन्हेजळगांवशासकीयसामाजिक

झिंग झिंग झिंगाट : तीन दिवस राहणार मध्यरात्रीपर्यंत मद्यविक्री

मुंबई ;- ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने मद्यप्रेमींसाठी एक गुड न्यूज असून यंदा मद्य प्रेमींच्या आनंदात भर टाकणारी न्यूज आहे. मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट देण्यात आली असून २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम १३९(१) (सी) आणि कलम १४३) (२) (एच) (४) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ आणि ३१ डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचं दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.

बीअर बारला रात्री १२ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे क्लबला देखील रात्री मुभा असेल. क्लबसाठी पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री ११:३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button