
हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीतर्फे ‘युवा आदर्श समाजसेवक पुरस्कार वितरण
जळगाव प्रतिनिधी
हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने प्रदान केल्या जाणाऱ्या ‘युवा आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने प्राध्यापिका अमृता सिद्धार्थ नेतकर आणि रईस खा कुरेशी यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार समारंभ 23 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.
प्राध्यापिका अमृता सिद्धार्थ नेतकर यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांना नवी दृष्टी दिली आहे. त्यांच्या योगदानामुळे अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता व सामाजिक जाणीव विकसित करण्याची संधी मिळाली आहे. तर, रईस खा कुरेशी यांनी समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी दिलेल्या मदतीची विशेष दखल घेण्यात आली.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुरस्कार विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीतर्फे दरवर्षी समाजसेवा, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येतो. या पुरस्कारामुळे तरुणांना समाजसेवेसाठी अधिक प्रेरणा मिळेल, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.