पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील गाळण मध्ये आमदार किशोर पाटील यांनी भाजपाच्या अमोल शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का दिला असून भारतीय जनता युवा मोर्च्यांचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदेंसह, गाळण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी सरपंच रोहिदास (गोटू नाना) पाटील यांचेसह सुमारे शंभरहून अधिक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आमदार किशोर अप्पा पाटील यांचे विकासकामांनी आम्ही प्रभावित असून गाळण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शिवसेनेत जाहिरपणे प्रवेश करत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली तर विधानसभेत शिवसेनेला मताधिक्य मिळवून देण्याचा शब्दही दिला. गाळण गावातील विठ्ठल मंदिरात रविवारी रात्री हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तालुका प्रमुख तथा बाजार समिती संचालक सुनील पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे, डॉ. बी. बी. राजपूत, तालुका समन्वयक ॲड. दीपक बोरसे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील, उप सरपंच, ईश्वर पाटील, सरपंच आत्माराम राठोड, माजी सरपंच राजेंद्र राठोड इत्यादी. सह मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपसथितीत होते.यावेळी रावसाहेब पाटील, सुनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले . आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणातून गाळण बु”, गाळण खू”, हनुमानवाडी, विष्णुनगर आदी भागात केलेल्या विकास कामांची माहिती देत पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असा शब्द देत विकास कामांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन नितीन राजपूत यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड. दीपक बोरसे पाटील यांनी मानले.