जळगावः लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या मयूर प्रशांत पाटील (वय २१, रा. इदगाव ता. जळगाव) याच्यावर शहर पोलिसांनी कारवाई करीत ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी गुप्ती हस्तगत केली असून त्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ गुप्ती घेवून दहशत माजविणाऱ्या मयूर पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मयूर प्रशांत पाटील यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली .