जळगाव ;- तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग करून वाईट उद्देशाने पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या तावडीतून मुलीच्या आईने सोडविले असता आरोपी हा पळून गेला होता . मात्र याप्रकरणी आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र छन्नु कोळी रा. ममुराबाद ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत वास्तव्याला आहे. १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राजेंद्र कोळी हा महिलेच्या घरी आला. त्यावेळी वाईट उद्देशाने त्याने आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करत तिला उचलून पळवून नेत असतांना पिडीत मुलीच्या आईने त्याला पकडले. मात्र आरोपी हा पळून गेला होता. पिडीत मुलीसह तिच्या आईने जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी राजेंद्र कोळी याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला पोलिसांनी अटक केली असून तपस पोलीस उपनिरीक्ष माणिक सपकाळे करीत आहे.