जळगाव :- ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतांना दुचाकीवरील वयोवृद्ध रस्त्यावर पडले व त्याचवेळी अज्ञात वाहनाने वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना शहरातील गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर शुक्रवारी घडली तर दुचाकीस्वार मुलगा गंभीर जखमी झाला. युसूफ शेख ईस्माईल खाटीक (78, रा.पारोळा) असे मयत वृद्धाचे नाव आहे तर या अपघातात अस्लम शेख युसूफ खाटीक (44, रा.पारोळा) हे गंभीर जखमी झाले.
पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळे तपासणी करण्यासाठी आलेले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयातच होते. शुक्रवार, 5 जानेवारी रोजी त्यांची घरी जाण्यासाठी सुटका झाली होती. त्यामुळे अस्लम शेख युसूफ खाटीक त्यांचे वडील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्यासोबत दुपारी एक वाजता ते दुचाकीने (क्र. एम.एच.19, ई.एफ.7524) घरी पारोळा येथे परत जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. त्यावेळी मागे बसलेले त्यांचे वडील युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले आणि मागून येणार्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले.
याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आह