
घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने रोकड सह मोबाईल केला लंपास
जळगाव प्रतिनिधी
घराचा दरवाजा उघडून घरातील सर्वजण झोपले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात शिरूर दहा हजाराची रोकड आणि तेरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेली माहिती अशी की शिवाजीनगर हुडकून परिसरात राहणाऱ्या रवीना रमेश सोनवणे या आपल्या कुटुंबियासह 16 रोजी घराचा दरवाजा लोटून झोपून गेल्या असल्याचा फायदा घेत अभ्यास करताना घरात प्रवेश करून रविना सोनवणे यांच्या पर्स मधून दहा हजार रुपये रोख आणि तेरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून आल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.