जळगाव ;- एका महिलेला तिचे नणंद आणि दीर यांनी शिवीगाळ मारहाण करून नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी ५ जानेवारी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, माया गणेश सुर्वे (वय-२८) रा. डीएनसी कॉलेज जवळ, जळगाव या महिला परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महिला ह्या जळगाव शहरातील तहसील कार्यालयासमोरील रोडवर असताना काहीही कारण नसताना तिचे नणंद आणि दीर यांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती. . यात महिलेचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले, त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी ५ जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली . त्यानुसार नणंद वैशाली संजय बोरसे, दीर अनिकेत तानाजी सुर्वे आणि ज्ञानेश्वर दिलीप सुर्वे सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव या तिघां विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनारे करीत आहे.