जळगाव येथे २१ जानेवारी रोजी होणार ऑडिशन ; सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव ;- येथील सदा बहार ऑर्केस्टा तर्फे व्हॉइस ऑफ महाराष्ट्रा मेगा सिंगिंग कॉम्पिटिशनचे या राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून २१ जानेवारी रविवार रोजी जळगावात येथे ऑडिशन घेण्यात येणार असून परीक्षकांकडून स्पर्धकांची निवड केली जाणार आहे विजयी स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने या गायन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .
शहरातील स्टेशन रोडवर असणाऱ्या व.वा. वाचनालय सभागृहात २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान ऑडिशन घेण्यात येणार आहे. . स्पर्धेची प्रवेश फी १५० रुपये आहे. स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून पहिल्या गटात ५ ते १७ वर्ष आणि दुसर्या गटात १८ वर्षांवरील वयोगट असणार आहे.स्पर्धकाने गाणे मराठी किंवा हिंदी भाषेत गायचे आहे. विजेत्या स्पर्धकांना मोठा गट प्रथम बक्षीस २१ हजार रुपये रोख ,द्वितीय ११ हजार रुपये रोख आणि तृतीय बक्षीस ५१०० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह . तसेच लहान गट प्रथम पारितोषिक ११ हजार रोख,द्वितीय पारितोषिक ५१०० आणि तृतीय पारितोषिक २१०० रोख आणि सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्कार विविध नामांकित कंपन्यांकडून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नावनोंदणीसाठी ८४२१२२३३६० आणि ८८८८०८३०६३ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.