जळगाव : – इच्छा पत्रातील मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून त्यावर मयताची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याप्रकरणी जयेश मुकेश ललवाणी, रोहन मुकेश ललवाणी (दोघे रा. शिरसोली रोड) राजेश शांतीलाल ललवाणी (रा. जयनगर) व अजय शांतीलाल ललवाणी (रा. शिरसोली रोड) यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
मौजे मेहरूण शिवारातील गट क्रमांक ४६४/१ प्रकरणी आर्किटेक्ट दिलीप आनंदा कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्ह दाखल झाला होता. त्यानंतर चौघांन अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवार, जानेवारी सुनावणी होऊन न्या. एस. एन राजूरकर यांनी जामीन अर्ज फेटाळला सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडली.