जळगाव ;- जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी शिवीगाळ करत तीक्ष्ण वस्तूने डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील अयोध्या नगरातील साई पार्क परिसरात गुरुवार ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली . याबाबत तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अयोध्या नगर, साई पार्क येथे चंद्रप्रकाश राजाराम यादव (वय-३७) हा तरुण राहायला असून ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून याच परिसरात राहणाऱ्या शुभम परदेशी, जयेश परदेशी आणि सुनीता परदेशी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच धारदार वस्तूने डोक्यावर वार करून दुखापत केली. जखमी झालेल्या चंद्रप्रकाश यादव या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेऊन त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.