जळगाव :- महापालिकेत अनुकंप तत्वावरील ५४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना येत्या दोन दिवसात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच दुसऱ्या टप्प्यात २६ कर्मचाऱ्यांच्या देखील नियुक्त्या देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्यात अनुकंप धारकांच्या प्रतिक्षा यादीमधील ५५ उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. यात गट क मधील लिपिक टंकलेखक-२३ कनिष्ठ अभियंता -४, रचना सहायक १, संगणक तंत्रज्ञ १, वाहन चालक- ५, स्वच्छता निरीक्षक एक दूरध्वनी चालक -१ अशी एकुण ३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून गट ड मध्ये शिपाई – १४, भालदार चोपदार- १, माळी -१ मलेरिया कुली- २ अशी १८ पदे भरण्यात येणार आहेत. या ५५ जणांना अनुकंपा तत्त्वावर दोन ते तीन दिवसात नियुक्ती देण्यात येणार आहे.