वरणगावः – भुसावळ तालुक्यातील तळवेल बसस्थानक परिसरातील काशिनाथरामु पाटील यांचे बखळ प्लाट समोरील रोडवरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चाळीस हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टरची ट्रॅलीचोरटयांनी लांबविण्याची घटना उघळकीस आल्याने वरणगाव पोलिसात अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर पुंडलीक पाटील तळवेल ता. भुसावळ याचे मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमाक एम एच १९. बी क्यु २४४२ हे दि ३ व ४ तारखेपासून काशिनाथ रामु पाटील यांचे बखळ प्लाट समोरील रोडवर उभे होते. त्यांनी ४ तारखेला सकाळी पाहीले असता रोडवर ट्रॉली दिसली नाही. त्यांनी गावात व परिसरात शोध घेतला असता ट्रॉली मिळून आले नाही. चाळीस हजार किमतीचे लाल रंगाची ट्रॉली दहा फुटलांब सहा फुट रुंद दोन फूट उंच असलेली ट्रॉली लांबविण्याप्रकरणी मधुकर पाटील यांचे फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.