भुसावळः – शहरातील साकेत सोसायटी हॉटेल प्रिमीयरच्या मागे जामनेर रोड लगत राहत असलेले शिक्षक महेश लोटनगीर गोसावी हे बाहेरगावी गेलेले असताना दि २९ ऑगस्ट ते दि ३ सष्टेबर दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करत २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी केल्याची घटना घडली होती.
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तांत्रीक तपास करून संशयीत आरोपी शाकीर ऊर्फ गोलु सय्यद राशीद उस्माने, मुस्लीम कॉलनी (वय २६) मुस्तफा मंजुर पिंजारी (वय २३) भुसावळ, खडका रोड, या दोघांना गुन्हयाचे तपासात पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा. पो. निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकों यासीन पिंजारी, पोहेकॉ महेश चौधरी, पोहेकॉ समाधान पाटील, पोहेकॉ रमन सुरळकर, पोहे कॉ उमाकांत पाटील, पोहेकॉ निलेश चौधरी, पोहे कॉ सचिन चौधरी, पोहे कॉ जावेद शहा पोहेकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ योगेश माळी, पोकॉ राहुल वाणखेडे, पोकों अमर अढाळे यांनी संशयीत आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुन्हयात चोरी गेलेला खालील प्रमाणे संपुर्ण माल हस्तगत केलेला आहे दिड लाख किमतीची एक २७ ग्रॅम सोन्याची पोत, ५० हजाराची सोन्याची लगड १० ग्रॅम वजनाची असा एकुन ३७ ग्रॅम असे गुन्हयात चोरी गेलेला दागिणे हस्तगत करण्यात आलेला आहे.