खान्देशगुन्हेजळगांवशासकीय

मंडळाधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न ; चालक पसार

वरणगाव ;- भुसावळचे तहसिलदार व त्यांचे सहकारी रात्रीच्या सुमारास फुलगाव उडान पुलावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करती असताना वरणगाव सजा मंडल अधिकारी त्यांच्या सहकार्यार्‍याच्या अंगावर डंपर आणुन तर नंतर तहसिलदाराच्या वाहनास धडक देऊन जळगावच्या दिशेने पसार झाले मात्र वरणगाव पोलीस व महसुल विभागाच्या पथकाने पाठलाग करीत डंपरला ताब्यात घेतले. मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना दि ११ गुरुवार रोजी घडली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने अवैध गैण खनिज व रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात जोरदार मोहीम राबविण्यात येत असून या साठी रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने वाहतुक करणाऱ्या विरोधात कारवाही करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरीय रात्रीचे गस्त पथक नेमणुक करण्यात आले आहे. दि ११ गुरुवार रोजीच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास वरणगाव मंडळ अधिकारी रंजना तयाडे , तलाठी (तळवेल ) मंगेश पारीसे , कोतवाल जायराज भालेराव , शरद पवार , फिरोज खान सिंकंदर खान पिंपळगाव खु ॥ मंडळ अधिकारी , निनित केले (तलाठी ) मिलींद तायडे , तलाठी , जितेद्र चौधरी (कोतवाल ) हे फुलगाव उड्डान पुलावर रात्री अकरा वाजेच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या डंपरला हात देऊन थांबण्याचा इशारा दिला. मात्र त्यावरील चालकानाने डंपर नथांबविता यांच्या अंगावर आणल्याने गस्त पथक जमीनीवर कोसळले तर डंपर भरधाव वेगाने मुक्ताईनगर च्या दिशेने सुसाट वेगाने निघुन गेला पथकाने त्याच्या जवळील वाहन क्र एम एच ०४ डी एल ६४८ व एम एच ०१ ए एल ३२९४ या वाहनाने पाठलाग केला असता डंपर क्र एम एच १९ झेड ४६७९ हे रेतीचे डंपर बोहर्डी गावा जवळील पुला खालून वळण घेत जळगावच्या दिशेने वेगाने जात असल्याची तहसिलदार यांना माहीती पथकाने देत मदत मागितली .

तेव्हा भुसावळ जवळील वाजोंळा नाक्यावर तहसिदार यांचे वाहन घेत मंडळ अधिकारी प्रफुल कांबळे , व विलास नारखेडे ( चालक ) रोडवर थांबुन डंपरला थाबण्याचा इशारा केला. मात्र डंपर चालकाने डंपर वेगाने चालवत जिवेठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर अणून भरधाव वेगाने जळगावच्या दिशेने निघुन गेला . त्याचवेळी गस्तीवरील तिघ पथक व वरणगाव पोलीसाच्या मदतीने डंपरचा पाठलाग करीत असताना कडगाव रस्त्यावर एका मोटर सायकल क्रं एम एच १९ डी ५९५० वरील याने डंपरचा करू नये, या उद्देशाने पथकानाच्या वहानाच्या समोर रस्त्याच्या मध्यभागी चालत असल्याने अडथळा निर्माण झाला होता . मात्र त्याच रस्त्यावर थोड्या अंतरावर डंपर चालकाने शेती शिवारातील रमेश शिवराम सपकाळे यांच्या उभ्या ज्वारीच्या शेतात रेती भरलेले डंपर खाली करून पिकाचे नुकसान केले व डंपर जाग्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला.
या बाबत मंडल अधिकारी रंजनी तायडे यांच्या फिर्यादीनुसार डंपर चालक व मोटर सायकल चालक यांच्या विरोधात भा द वी कलम ३०७ , ३५३ , २७९ , ३७९ , ४२७ , १८४ , १७७ , ४८ ( ७ ) ४८ ( ८ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास उप निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button