खान्देशगुन्हेजळगांव

लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन हेड कॉन्स्टेबलवर गुन्हा

पाचोरा ;- येथील पाचोरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन कारकून असलेल्या हेड कॉन्स्टेबलने सुमारे १०२. ९३ . ग्राम सोने,६. ४६४ किलोग्रॅम चांदी आणि १२ लाख ३७ हज़ार रोख असा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे पोलीस दलातील वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान ७३. ६३ ग्राम सोने व चांदीचे दागिने आणि ६ लाख ८५ हजार जप्त करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी कि तत्कालीन पाचोरा पोलीस स्टेशनचे मुद्देमाल कारकून पोहेकॉ यशवंत कचरू बोरसे यांनी २ जानेवारी २०२२ पूर्वी पाचोरा पोलीस स्टेशनला असताना त्यांना नेमून दिलेल्या मुद्देमाल कोरकूंच्या शासकीय कामकाज कर्तव्यपूर्तीसाठी असताना त्यांच्या रखवालीत वेळोवेळी विश्वासाने सोपविण्यात आलेल्या शासकीय रकमा , पैसे,गुन्ह्यातील जप्त असलेले मौल्यवान धातूचे सोन्या चांदीचे दागिने यात सोने १०२.. ९३ ग्राम ,चांदी ६ .४६४ किलो ग्राम तसेच १२ लाख ३७ हजार रोख रक्कम याचा अपहार करून शासनाची फसवणूक केली . संशयितांकडून ७३. ६३ ग्राम सोने व चांदीचे दागिने आणि ६ लाख ८५ हजार जप्त करण्यात आले आहे.

. याबाबत पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी फिर्याद दिल्यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा १३ जानेवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित यशवंत बोरसे यांच्याकडे अजून २९.. ३० ग्राम वजनाचे दागिने आणि ५ लाख ५२ हजार ५७७ रुपये वसूल करणे बाकी आहे. तसेच शासकीय चलन,ट्राफिक चलन ,अमलदारांची सरेंडर बिले,तपास फंड ,बक्षीस रकमा आदींचा तपास करणे बाकी असल्याचे सूत्रांची सांगितले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button