राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने मुंबईला रवाना

मुंबई l वृतसंस्था l ०५ जुलै २०२३ l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरातून तातडीने मु्ंबईला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. बुधवारी, त्यांचे या जिल्ह्यात कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींना राजभवनात त्यांनी सोडले. त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यामुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button