मुक्ताईनगर ;- शहरातील संताजी नगर येथे डाळ वाळायला टाकली असता लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिस्कावून पोबारा केल्याची घटना १३ जानेवारी रोजी येथे घडली . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, संताजी नगरमध्ये राहणाऱ्या प्रज्ञा प्रदीप तळेले वय ५२ या १३ रोजी डाळ वाळायला टाकली असता ते पाहण्यासाठी गेल्यावर लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यानी त्यांच्या गळ्यातील ७ ग्राम वजनाचे सोन्याचे ३० हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र लांबवून पळ काढला . याप्रकरणी प्रज्ञा तळेले यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला धाव घेऊन दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.