जळगाव : आपण जी दुचाकी घेत आहे, ती चोरीची असल्याचे माहिती असतांना देखील चोरीची दुचाकी घेणाऱ्या फारुख हुस्नोउद्दीन शेख (वय २९, रा. एरंडोल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे.
एरंडोल येथील फारुक न हुस्त्रोद्दीन शेख याने चोरीची व दुचाकी घेतली असून ती त्याच्या घरी असल्याची माहिती स्थानिक न गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि नीलेश न राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनील दामोदरे, महेश महाजन, नंदलाल पाटील, संदीप सावळे, पोलिस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, अशोक पाटील, पोकॉ ईश्वर पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने एरंडोल येथे जाऊन फारुक याची चौकशी केली.
त्याच्याकडे असलेली चोरीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही दुचाकी जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती. एलसीबीने शेख याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.
एलसीबीने ताब्यात घेतल्या संशयिताने ही दुचाकी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे (रा. पथराड, ता. भडगाव) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.