खान्देशगुन्हेजळगांव

यावल पुन्हा हादरले ; रीधूरी येथे कुऱ्हाडीने केली प्रौढाची हत्या

यावल;- तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील मुलाने पित्याची हत्या कुऱ्हाडीने केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रीधूरी, ता.यावल येथे घराच्या वापरच्या रस्त्यावरून झालेल्या वादात 50 वर्षीय प्रौढाचा कुर्‍हाडीने वार करीत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. तसेच हाणामारीत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले. धनराज वासुदेव सोनवणे (50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दोन कुटुंबांमध्ये रीधूरी, ता.यावल येथे सोमवारी १५ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घराच्या वापर करण्याच्या रस्त्यावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने या हाणामारीत धनराज वासुदेव सोनवणे (50) यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आला यात धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले तर सतीश सुखदेव सोनवणे (30) व आरती सतीश सोनवणे (28) या दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार राजेश बर्‍हाटे, देविदास सूरदास, विकास सोनवणे, उमेश चौधरी, रवींद्र मोरे, विजय चौधरी, अरुण नमायते हे दाखल झाले व त्यांनी मृतदेह व जखमी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे, डॉ.इरफान खान, अधिपरिवारीका माधुरी ठोके, आतीश खडके, चेतन भोईटे आदींनी प्रथम उपचार केले. जखमी दाम्पत्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button