खान्देश टाइम्स न्यूज l ०७ मे २०२४ l जळगाव l महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.५ रोजी आसोदा, भादली आणि ममुराबाद येथे प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, जिल्ह्याच्या विकासासाठी आमचे मत ‘मशाल’लाच राहील, अशा विश्वास दिला.
करणदादा पाटील यांचे गाव-गावात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी औक्षण करून आशीर्वाद दिले. रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संभाजी पाटील यांच्या घरी भेट दिली. आसोदाचे सरपंच सागर कोळी यांच्या घरी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तर डॉ. रमाकांत कदम यांच्या घरी डोक्याला फेटा बांधून, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवासेनाच्या जळगाव जिल्हा विस्तारक स्वप्ना चौधरी, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे, माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी अण्णा), शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चव्हाण, विजय लाड, सचिन धुमाळ, राकेश लाड, विजय पाटील, सचिन चौधरी, कृष्णा ठाकूर, महेश सानप, सचिन धुमाळ, विशाल पालवे, भागवत पाटील, भागवत पवार, अरुण कोळी, शुभम लाड, बाळकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, राहुल घुगे, राकेश घुगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, तालुका सरचिटणीस मुरली सपकाळे, उपाध्यक्ष विशाल सपकाळे, रवी सोनवणे, असोदाचे सरपंच सागर कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप कोळी, हेमंत पाटील, धवल पाटील, बंटी भारी, अरुण कोळी, दिलीप कोळी, ग्रा. पं. सदस्य हेमंत पाटील, संदीप कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भैय्या सपकाळे, एजाज पाटील, विनोद कोळी, मनोहर महाजन, मनोज चौधरी, ललित रडे, किशोर माळी, छगन खडसे, आबा कोळी, आकाश कोळी, विनोद कोळी, छोटू कोळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष बंटी चव्हाण यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
धार्मिक स्थळांना भेटी देऊन घातले साकडे :
भादली, असोदा आणि ममुराबाद येथे काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी विविध मंदिरांना भेटी देऊन साकडे घातले. भादली येथे श्री गणपती मंदिर, श्री दत्त मंदिर, महर्षी वाल्मीक ऋषी मंदिर, श्री ज्ञानेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, श्री कृष्ण मंदिर दर्शन आणि आसोदा येथे श्री हनुमान मंदिर, श्री बिरोबा चांगसुलतान मंदिर आणि श्रीराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला देखील त्यांनी भेट देऊन अभिवादन केले.