गुन्हेजळगांव

जळगाव तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, घटनास्थळी दगडफेक?

खान्देश टाइम्स न्यूज | १६ जानेवारी २०२४ | जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या एका पान सेंटर समोर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. दरम्यान, यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी किरकोळ दगडफेक केल्याचे समजते.

जळगाव शहरातील भवानी पेठ परिसरात राहणाऱ्या यशाजी चव्हाण या तरुणाचा मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका तरुणासोबत किरकोळ वाद झाला होता. वाद वाढल्याने हमरीतुमरी होऊन एकाने यशाजी याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक देखील केल्याचे समजते. यशाजी याच्यावर भगवान सोनवणे नामक तरुणाने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

जखमी यशाजी याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button