चाळीसगाव;- इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिश दाखवून एका 26 वर्षीय महिलेवर चाळीसगाव येथे बलात्कार केल्याचा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी एकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय भाजी विक्री करणाऱ्या महिलेची इंस्टाग्राम वर आरोपी हृतिक पाटील पूर्ण नाव माहित नाही रा. धुळे याच्याशी इंस्टाग्राम द्वारे एक दोन महिन्यापूर्वी महिलेची ओळख झाली. तसेच आरोपी हृतिक पाटील याने 5 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव -धुळे रोडवरील डांबर प्लांट जवळील मोकळ्या जागेत महिलेच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याबाबत पीडित महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋतिक पाटील यांच्या विरुद्ध भादवी कलम 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहे.