खान्देशगुन्हेजळगांव

एरंडोलच्या प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव ;- एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन वाळू माफियांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाचोरा येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकाने पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

गिरणा नदीपात्रशून अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड व महसूल विभागाचे पथक एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदी पात्रात गेले होते. यावेळी प्रांताधिकारी गायकवाड यांच्या अंगावर वाळूचे ट्रॅक्टर घालून तसेच दगडफेक करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणातील हल्लेखोरांचा शोध सुरू असताना हे हल्लेखोर पाचोरा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार हे पथक पाचोरा येथे पोहोचले संशयित वाळूमाफिये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश राजेंद्र पाटील (वय २६), अमोल अरुण चौधरी (वय ३२), दादाभाऊ महादेव गाडेकर (वय ३६) सर्व रा. पाचोरा यांचा पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पुढील कार्यवाहीसाठी तिघांनाही कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई !
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, अक्रम शेख लक्ष्मण पाटील, महेश महाजन विजय पाटील, रणजीत पाटील, अश्विनी सावकारे यांचे पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button