खान्देशगुन्हेजळगांव

खुनाचा सूड घेत युवकाची गोळी झाडून निर्घृण हत्या

धरणगाव तालुक्यातील घटनेने खळबळ

खुनाचा सूड घेत युवकाची गोळी झाडून निर्घृण हत्या

धरणगाव तालुक्यातील घटनेने खळबळ

जळगाव | प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्यावर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी) या युवकाची गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या २०१० मध्ये झालेल्या एका खुनाचा सूड घेण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे. हल्लेखोर राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) याने गोपाळ मालचेंवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली असून, हल्ल्यानंतर तो स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलच्या वडिलांचा ज्ञानेश्वर सावंत यांचा खून २०१० मध्ये झाला होता. त्या प्रकरणात गोपाळ मालचेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच राहुलनेहे पाऊल उचलल्याचे त्याने कबूल केले आहे.

गोळ्यांपैकी एक थेट गोपाळ मालचेंच्या डोक्यात लागली, त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून, पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button