एरंडोल;- शहरातील शेतकी संघ कॉम्प्लेक्स मधील हरिओम एंटरप्राइजेस नावाच्या मोबाईलच्या दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे मोबाईल आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एरंडोल शहरातील गोपाल देविदास दांडगे वय 38 यांचे शहरातील शेतकी संघ कॉम्प्लेक्स येथे हरिओम एंटरप्राइजेस नावाचे दुकान असून अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटर चे कुलूप तोडून हात प्रवेश करून दोन लाख 88 हजारांचे 19 मोबाईल आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार तीन जुलै ते चार जुलै दरम्यान सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला याप्रकरणी गोपाल दांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.