मुक्ताईनगर;- तालुक्यातील सालबर्डी येथील शेतकऱ्यांच्या बंद घराचे कुलूप कापून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोकड व सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ डिसेंबर रोजी रात्री दहा ते ४ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली असून चोरट्यांनी एकूण एक लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,तालुक्यातील सालबर्डी येथील गणेश अनिल झोपे वय 28 हे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात . ३ डिसेंबर रोजी रात्री दहा ते ४ रोजीच्या पहाटे पाच वाजे दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 50 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पंचवीस हजार रुपये किमतीचे कानातील डोंगल ,12500 रुपयांचे मंगळसूत्र आणि 35 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 57 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद गणेश झोपे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे करीत आहे.