खान्देशगुन्हेजळगांव

फुलगाव येथील ५१ वर्षीय प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

वरणगाव : फुलगाव येथे ५१ वर्षीय संतोष त्र्यंबक लोणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

फुलगाव येथील संतोष त्र्यंबक लोणे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. विकास लोणे हे वेल्हाळे येथील विकास सोसायटीमध्ये सेक्रेटरी पदावर कार्यरत होते. बुधवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात रुमालाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत त आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मले असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button