
अमळनेरमध्ये गुजरातच्या तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसमोर व्हिडीओ कॉलवर घेतला गळफास
अमळनेर (प्रतिनिधी): गुजरातमधील अहमदाबाद येथून सुमारे 400-425 किमी प्रवास करून अमळनेरला आलेल्या एका तरुणाने लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.
त्याच्याविरुद्ध अहमदाबाद येथे पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सौरभ हा अमळनेर बसस्थानकाजवळील एका लॉजमध्ये उतरला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला आणि त्याचवेळी गळफास घेऊन आयुष्य संपवले.
ही घटना समजताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.