अडावद;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेला ‘तू मला आवडते मला तुझ्या सोबत काम करू दे’ असे सांगून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा अडावद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला आरोपी कैफ जब्बार मेवाती रा. इमामी चौक अमळनेर याने 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात प्रवेश करून ‘तू मला आवडते’ मला तुझ्या सोबत काम करू दे असे बोलून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. प्रकरणी महिलेने अडावद पोलीस स्टेशनला 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरोपी कैफ मेवाती याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तपास पोहे को जयदीप राजपूत करीत आहे.