खान्देशगुन्हेजळगांव

जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात बदली कण्यात आली आहे. याबातचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी काढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

त्यानंतर जिल्ह्यातील २२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व १६ पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. या सोबतच आता नाशिक परिक्षेत्रातील १८ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी काढले. यामध्ये जिल्ह्यातील काशिनाथ कोळंबे यांची नाशिक ग्रामीण, शांताराम पाटील यांची नाशिक ग्रामीण, मसलोद्दीन शेख यांची अहमदनगर, हनुमान उगले यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. अहमदनगर येथून ज्योती डोके (परिविक्षाधीन), नाशिक ग्रामीण मधून कैलास ठाकूर हे दोन पोलिस उपनिरीक्षक जळगावला येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button