अयोध्या ;- अयोध्येतील राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे.
तिन्ही संशयित सुखा डंके, अर्श डल्ला टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्श डल्लाच्या टोळीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सध्या एटीएसकडून संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.या संशियतांचा संबंध कॅनडात ठार झालेला सुक्खा दुनके, अर्श डल्ला टोळीशी असल्याचं उत्तर प्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं. त्यांनी माहिती देताना सांगितलं की, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं अयोध्या जिल्ह्यात तपासणीदरम्यान तीन संशयित लोकांना अटक केली आहे.
ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोध्येत राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य यजमानांच्या रूपामध्ये उपस्थित असलीत. नरेंद्र मोदींसोबत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो व्हीआयपी निमंत्रित उपस्थित राहणार आहेत, त्या मुळे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.