खान्देशजळगांव

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव ;- प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला उद्या रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून प्रभू श्रीरामलला यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली जाईल.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजीत व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजीत ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीचे कलावंत करतील. प्रख्यात कवी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीत रामायणामधील निवडक आशय प्रधान गाण्यांवर नृत्य दिग्दर्शन करून ‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले जाईल. प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी नृत्यसंरचना दिग्दर्शित केल्या असून सुमारे २२ कलावंतांच्या माध्यमातून त्या सादर केल्या जातील. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल सांभाळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button