जळगावः;- शासनाच्या सहकार व पणन विभागाने उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दि.२४ रोजी जारी केले आहे.
त्यात जळगाव येथे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या पदावर जी.जी. बलसाने रूजू होणार आहे. श्री बलसाने हे विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक येथे कार्यरत होते. अधिकाऱ्यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रूजू व्हावे असे आदेश कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी दिले आहे.