जळगाव : घराच्या कंपाऊंटमध्ये लावलेली दीड लाखांची सायकल चोरट्यांनी लांबवल्याची घटना दि. १५ जानेवारी मायादेवी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दादावाडी परिसरातील योगेश प्रकाश बडगुजर (वय ३०) हा तरुण – ह. मु. मायादेवी नगरात वास्तव्यास आहे. ते मुंबई येथील महानगर पालिकेत अग्निशमन विभाग भायखडा येथे नोकरी करीत करतात. योगेश बडगुजर याच्याकडे स्कॉट कंपनीची दीड लाख रुपये किंमतीची सायकल आहे. दि. १४ जानेवारी ते घरी आल्यानंतर त्यांनी सायकल बाहेर फिरवून आणली आणि त्यानंतर घराच्या कंपाऊंटमध्ये लॉक करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास योगेश बडगुजर हा तरु ण बाहेर जाण्यासाठी सायकल लावलेल्या ठिकाणी गेला असता, त्याला सायकल दिसून आली नाही. दरम्यान, बडगुजर याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.