जळगांव

जळगाव जिल्ह्यात येणार २ नवीन पोलीस निरीक्षक

खान्देश टाइम्स न्यूज | २७ जानेवारी २०२३ | राज्यात सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत असून आज विनंती बदल्यांची यादी जाहीर झाली. जळगाव जिल्ह्यात आणखी दोन निरीक्षक दाखल होणार असून महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांची धुरा त्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी शनिवारी ४४ पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदलीचे आदेश पारित केले. जळगावात दोन नवीन निरीक्षक दाखल होत असून दोघे इतर जिल्ह्यातून येत आहेत. लोहमार्ग मुंबईचे दत्तात्रय निकम आणि अमरावती ग्रामीणचे प्रदीप ठाकूर यांची जळगाव जिल्ह्यात वर्णी लागली आहे. दोन निरीक्षक जिल्ह्यात येत असल्याने महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक केली जाईल असे म्हटले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button