देश-विदेश
कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – मनोज जरंगे पाटील
जालना ;- अंतरवाली सराटीमध्ये आज झालेल्या बैठकीनंतर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असे ते म्हणाले. तसेच उद्या रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईमधील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.