खान्देशगुन्हेजळगांव

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

 

जळगाव : दशक्रिया विधीसाठी जात असलेल्या कमलाकर मोतीराम पाटील (वय ६४, रा. जळके, ता. जळगाव) यांना वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने चिरडले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पळासखेडा मिराचे गावाजवळ घडली. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला व काही वेळानंतर घटनास्थळावरून डंपरही पळवून नेण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले कमलाकर पाटील यांचे गावातच किराणा दुकान आहे. किरणा दुकान चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. रविवारी त्यांच्या नातेवाईकांकडे दशक्रिया विधी असल्याने (एमएच १९, डीएन ७९१४) क्रमांकाच्या दुचाकीने जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे सकाळीच जाण्यासाठी निघाले. पळासखेडा मिराचे गावाच्या पुढे गेल्यानंतर शाळेजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार कमलाकर पाटील हे जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच यावेळी जळके गावातील नागरिकांनी त्यांच्यानातेवाईकांना अपघाताविषयी माहिती दिल्याने त्यांनी देखील याठिकाणी धाव घेतली.अपघातानंतर कमलाकर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवलेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर दुपारी मयत पाटील यांच्यावर जळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर डंपरचाचालक डंपर सोडून घटनास्थळावरून पसार झाला. नागरिकांनी याठिकाणी धाव घेत चालकाचा शोध घेतला, मात्र चालक तो पर्यंत पसार झाला होता. त्या वेळी पळासखेडा गावचे पोलिस पाटील प्रकाश बिचारे यांनी डंपरची चावी ताब्यात घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button