जामनेर ;- तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास असणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आणि एका महिलेच्या घरात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून पॉस्को कायद्यांतर्गत जामनेर पोलीस स्टेशनला १ जुलै रोजी राती ९ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जामनेर तालुक्यात एका गावात १४ वर्षीय मुलगी रहात असून तिच्या असहायतेचा फायदा घेऊन आरोपी ज्योती ज्ञानेश्वर चौधरी आणि आरोपी नराधम सोनू बाळू पडोळ या दोघांनी मिळून ज्योती चौधरी हिच्या घरात आरोपी सोनू याने पीडित मुलीला आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध करून याची वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याची फिर्याद स्वता पीडित मुलीने फैजपूर पोलीस स्टेशनला दिली आहे. . त्यानुसार दोघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय अधिकारी धनंजय वेरूळे करीत आहे. दरम्यान नराधम सोनू बाळू पडोळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.