जळगाव : : वैद्यकीय तसेच कौटुंबीक कारणावरुन जिल्हा पोलिस दलातील ७६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या असून, सहा बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंगळवार, ३० जानेवारी रात्री काढले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातील बदल्यांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळी विनंती बदलीचे आदेश प्रलंबित होते. आता कौटुंबिक, वैद्यकीय कारणास्तव जिल्हा पोलिस दलातील ७६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. सहा जणांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. बदली झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई ते सहाय्यक फौजदारापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात आली असून, याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आले.