जळगाव:-९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २,ते ४ फेब्रुवारीपासून पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर येथे होत असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदाचा मान नागपूर येथील शिंपी समाज रत्न डॉ रवींद्र शोभणे यांना मिळाला असून काल दि ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सभागृह येथे त्याचा हितवर्धक संस्थेच्या वतिने अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव अनिल खैरनार कोषाध्यक्ष चेतन खैरनार यांनी त्यांचा श्रीफळ पगडी मानाचा गमछा देऊन सत्कार केला तसेच प्रा सौ अरूणा शोभणे यांचा सत्कार महिला अध्यक्षा सौ रेखाताई निकुंभ यांनी केला यानंतर डॉ रवींद्र यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले व सांगितले कीआजचा हा सत्कार माझ्या जीवनातील सर्वोच्च सत्कार असून घरच्यांनी केलेला सन्मान हा सर्वात मोठा सन्मान असून शिंपी समाजात जन्म घेऊन मी स्वतःला भाग्यवान समजतो कारणकि संत नामदेव महाराज यांनी पंढरपूर ते घुमान पंजाब पर्यत कार्य केले असून ते वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व ऊतकृष्ठ साहित्यिक व लेखक होते त्यांनीच दिलेल्या संदेशाप्रमाने हे कार्य आपण सर्व पुढे नेऊ असे या प्रसंगी सांगितले या कार्यक्रमास मा महापौर सीमाताई भोळे मा उपमहापौर सुनील भाऊ खडके जेष्ठ मार्गदर्शक सतिष नाना पवार अभिजीत भांडारकर प्रमुख उपस्थितीत होते संस्थेच्या कार्याचा आढावा व कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज भांडारकर यांनी केले कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी दिपक जगताप दिलीप सोनवणे मुकुंद मेटकर राजेंद्र बाविस्कर प्रदीप शिंपी सुरेशदादा सोनवणे गणेश सोनवणे शैलेंद्रकुमार सोनवणे दत्तात्रय वारूळे सुमित अहिरराव योगेश शिंपी डॉ उदय तल्हार CA रवींद्र खैरनार महिला मंडळ पदाधिकारी सौ आशा जगताप माधुरी शिंपी अनिता सोनवणे भाग्यश्री व रत्नाताई जगताप ई उपस्थित होते
आपला नम्र
मनोज भांडारकर संस्था प्रसिद्धीप्रमुख