
साखरपुड्याला आले आणि लग्न लावून गेले !
जामनेर येथील मुस्लिम समाजाचा आदर्श विवाह सोहळा
जामनेर प्रतिनिधी Iना लग्नपत्रिका, ना मानपान, ना बॅन्डबाजा … लग्नात कोणताही अनावश्यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्य असताना दोन्ही परिवार, वधू-वराच्या आग्रहाने साध्या पद्धतीने विवाह उरकून घेण्याचा प्रस्ताव मध्यस्थांनी मांडताच शेख बुरहान शेख वजीर यांचा मुलगा आणि जळगावातील नासिर शेख उर्फ शेराभाई शेख यांचा पुतण्या अल्ताफ शेख बुरहान याचा विवाह जामनेर येथील जावेद खान यांची मुलगी अरबीन नाज जावेद खान यांचा विवाह लावून देण्यात आला .
शेख बुरहान शेख वजीर यांचा मुलगा आणि जळगावातील नासिर शेख उर्फ शेराभाई शेख यांचा पुतण्या अल्ताफ शेख बुरहान हे नातेवाईकांसह जामनेर येथे साखरपुड्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांनी साखरपुड्यातच विवाह करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजात या आदर्श विवाह चे कौतुक होत आहे.
अनावश्यक खर्चाला फाटा देत हे लग्न आताच उरकून घ्यावे, असा प्रस्ताव मांडताच वधू अरबीन नाज जावेद खान आणि वर अल्ताफ शेख बुरहानने देखील होकार दिला. त्यानंतर अवघ्या काही वेळेतच विवाह सोहळा साजरा करण्यात आला.