जळगावातील दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; ५ दुचाकी जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव ;- दोंडाईचा येथील रहिवाशी असलेल्या एका दुचाकी चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फैय्याज शकुर मनीयार रा. ह. मु. सुप्रीम कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या आहे.
फैय्याज हा २ ते ३ महीण्यांपासुन वास्तव्यास असुन तो काहीच कामधंदा करीत नसुन त्याचे कडे चोरीच्या मोटार सायकली असल्याबाबतची गुप्त माहीती पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहीती वरुन त्याचे मागावर मागील ८ दिवसांपासुन टिम तयार करुन त्याचा शोध घेत होते. परंतु फैय्याज मनीयार हा मिळुन येत नव्हता. फैय्याज मनीयार हा जळगाव शहरात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावरुन गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याची न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली पोलीस कस्टडी रीमांड दरम्यान त्याचेकडुन खालील वर्णनाच्या मो सा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
25 हजार रु कि. हीरो कंपनीची पेंशन प्रो 25 हजार रु कि. होंडा अॅक्टीवा स्क्टर 20 हजार -रु कि. हीरो कंपनीची सिल्वर रंगाची फॅशन प्रो ,40 हाजरी रुपये कि. हीरो कंपनीची मोटारसायकल आणि 25 हजार रु कि. हीरो कंपनीची सुपर स्प्लेंडर १लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी मिळुन आल्या. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून २ मोटार सायकली जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आणि १ मोटार सायकल ही दोंडाईचा येथील आहे.
हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत पोलीस निरीक्षक जयपाल हीरे , पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी, पोहेका, दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना, किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे, सचीन पाटील, पोका, नाना तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर यांनी केली आहे.