अभिनेत्री पूनम पांडे मेलीच नाही ; जिवंत असल्याचा व्हिडीओ केला शेअर
मुंबई ;- अभिनेत्री पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अचानक, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या चाहत्यांना धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे
https://www.instagram.com/reel/C24C_LyIy6m/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
मी जिवंत आहे…सुदैवाने सरव्हायकल कॅन्सरमुळे माझं निधन झालेलं नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. पण, तुम्हाला माहितीये का? सरव्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व HPV लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाइटला जरुर भेट द्या” असं पूनम पांडेने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.