इतर

मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोन सराईत चोरटे गजाआड

जळगाव (प्रतिनिधी) :पिंप्राळा हुडको परिसरातून चोरलेली मोटारसायकल प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा यशस्वी पर्दाफाश करण्यात आला आहे.

नईम खान मुकीम खान (रा. पिंप्राळा, हुडको, जळगाव) यांची मोटरसायकल 24 मे 2025 रोजी चोरीला गेल्यानंतर, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 206/2025 अन्वये भारतीय दंड विधान (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास LCB जळगाव पथकाकडून सुरू असताना, गुप्त बातमीदारामार्फत अझहरूद्दीन सलीम शेख (वय 19, रा. पिंप्राळा, सध्या पाळधी, ता. धरणगाव) हा संशयित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, 6 जून 2025 रोजी राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान अझहरूद्दीन यास ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत त्याने, हा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार अब्रार हमीद खाटीक (वय 20, रा. उमर कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव) याचे नाव पुढे आले. अब्रार याला तुरुंगातून सुटताच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन्ही आरोपींसह चोरीस गेलेला मुद्देमाल रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप बी. पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. हरिलाल पाटील, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे यांनी संयुक्तपणे केली.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत व संघटित गुन्हेगारीमध्ये सक्रिय असून, त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांचा तपास लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button