चाळीसगाव :- शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, १८ जानेवारी रोजी शहरातील मालेगाव बायपास वर असलेल्या हॉटेल निवांत येथे रमाबाई अजय शिंदे वय ५५ हिने पीडित १४ वर्षीय मुलीला घेऊन कामाला जायचे आहे असे सांगून घेऊन गेली. तिथे झोपडीत आरोपी रवींद्र बापू अर्जुनसिंग राजपूत वय ५४ हॉटेल व्यावसायिक , केवल सिंग उर्फ संजू जयसिंग कचछ वय ५३ रा. धुळे रोड , पोस्टल कॉलनी यांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. कुणालाही हा प्रकार सांगण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास तीन जणांविरुद्ध भा.द.वि.कलम ३७६ (२) (एन), ३७६ (डो), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३ (अ), ४ (२) ५ (ग), ६, १६, १७ अन्वय गुन्हा दाखल केला .आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे . याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहे.